महापरिनिर्वाण दिन : अनुयायांमुळे चैत्यभूमी गजबजली

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्परिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी हजेरी लावली आहे. राज्यघटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते,सामाजिक कार्यकर्ते  आणि देशभरातील  भीमसैनिक एकत्र आले असून संपूर्ण दादर परिसर गजबजून गेला आहे.

चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी मात्र जास्त असल्याने त्यांच्या सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात येत आहेत. शिवाजी पार्क व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथे तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालयं, स्नानगृहं आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच लांबून येणा-या भीमसैनिकांना वाहन पार्क करण्यासाठी एस. व्ही. एस. रोड, रानडे रोड, एन. सी. केळकर रोड, केळुस्कर रोड (दक्षिण), केळुस्कर (उत्तर), गोखले रोड, दक्षिण व उत्तर, टिळक ब्रीज, भवानी शंकर रोड, एस. के. बोले मार्ग, सेनापती बापट मार्ग, फाइव्ह गार्डन्स, माटुंगा, माहिम रेती बंदर येथे सोय करण्यात आली आहे. दरम्यान, काल ओखी चक्रवादळामुळे उद्भवलेल्या समस्यांचा अनुय़ायांना सामना करावा लागला. त्यातच महिपालिकेने शिवाजी पार्कात बांधलेला मंडप कोसळून या दुर्घटनेत काही जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आला.

You might also like
Comments
Loading...