खा.छत्रपती संभाजीराजेंनी हजेरी लावलेल्या विवाहसोहळ्याला गर्दी, २५ जणांवर गुन्हा

sambhajiraje

बीड : सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात आयोजकांसह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याला खासदार छत्रपती संभाजी महाराज, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी हजर होती.

या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या सामुदायिक विवाह सोहळ्याला परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाहसोहळ्याला गर्दी जमा केल्यावरून 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे होते. मात्र, या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये बसलेल्या महिला एकत्रित बसलेल्या दिसत आहेत. प्रत्येकाने आपापले मास्क लावावे, अशा सूचना देखील छत्रपती संभाजीराजे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना केलेल्या. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं देखील संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.

राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे माजलगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या