राज्यातील शालेय शिक्षण विभागात कोट्यवधींचा खरेदी घोटाळा 

विरेश आंधळकर : शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या मध्यान्न भोजनासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या तूर डाळ तसेच इतर साहित्याच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षण घेणाऱ्या 1 कोटी 12 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मध्यान्न भोजन पुरवले जाते. या भोजनासाठी लागणाऱ्या डाळ तसेच इतर गोष्टींच्या खरेदीसाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी जानेवारी ते जून महिन्या दरम्यान टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र, यंदा ही टेंडर प्रक्रियाच राबवली गेली नसल्याच समोर आलं आहे. शिक्षण संचालक सुनील चौहान यांच्या आदेशानुसार तूर डाळ तसेच इतर साहित्याची खरेदी जुन्याच दराने करण्यात आली आहे.

कसा झाला घोटाळा

गेल्या वर्षी तूर डाळीचा भाव 154 रुपये होता. मात्र, ह्याच दराने यंदाही तूर डाळ खरेदी करण्यात आली आहे. सध्या तूर डाळीचा भाव 58 रुपये प्रती किलो आहे. म्हणजेच आपण फक्त तूर डाळीच्या खरेदीचाच विषय घेतला तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा शिक्षण विभागाकडून करण्यात आल्याचे दिसून येत. त्याच बरोबर भोजनासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची खरेदी देखील याच माध्यमातून करण्यात आली आहे.

मध्यंतरी राज्यात गाजलेल्या ‘चिक्की घोटाळ्या’ प्रमाणेच याही ठिकाणी सारखीच पद्धत वापरली गेल्याच प्रथम दर्शनी दिसून येत आहे. एकूणच सर्व चित्र पाहता या घोटाळ्यात अशा खरेदीचा आदेश देणारे शिक्षण संचालक  यांच्या सोबतच मंत्रालयातील मोठ्या मंत्र्यांचे देखील हाथ ओले झाले झाल्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे आता सुशासनाचा धिंडोरा पिटणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून या घोटाळ्याची दखल घेवुन दोषीवर कारवाई होणार का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

हे पहा तुम्हीच काय आहे सत्य