पीक कर्ज : शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे परभणी जिल्ह्यातील आंदोलन स्थगित

Sanjay Jadhav mp

परभणी : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळत नव्हते. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, तरी देखील बँका उडवाउडवीची उत्तरे देत होत्या. त्यामुळे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्त्वात शिवसेना जिल्ह्यातील बँकांना टाळे लावून आंदोलन करणार होती. मात्र, बँकांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

राज्यात दुष्काळ आणि अवकाळी या दोन्ही संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यात शासनाच्या वतीने पीक कर्ज योजना राबवली जात असली तरी बँकांच्या उदासिन धोरणामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा भेटत नाही. या संदर्भात शिवसेनेच्या परभणी शाखेच्या वतीने आंदोलनचा इशारा देण्यात आला होता. खासदार संजय जाधव या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार होते.

मात्र, आंदोलनापूर्वीच बँकांच्या वतीने या संदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती खासदार जाधव यांनी दिली आहे. बँकांनी लेखी आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज मिळेपर्यंत शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पीक कर्जाची चिंता कायम असल्याचेच दिसून येतय.

महत्त्वाच्या बातम्या

IMP