कृषि अधिकाऱ्यांकडून निलंगा येथे पिकांची पाहणी; आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दिल्या सूचना

agriculture

लातूर: जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद श. व कासार शिरसी कृषि मंडळामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी खरीप हंगामातील विविध पिकाची पीक पेरणी व पीक परिस्थितीची पाहणी करून कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयाबीन पीक पेरणीमध्ये बि.बि.एफचा वापर, पट्टा पद्धत व टोकण पद्धतीने लागवड तसेच रुंद सरी वरंभा वर सोयाबीन व तूर पिकांची लागवड या बाबीचा अवलंब करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

निलंगा तालुक्यातील त्यांच्या दौऱ्यात बळीराजा शेतकरी गट यांची विकेल ते पिकेल अंतर्गत बोरसुरी डाळ याचे वितरण व विपणन, बोरसुरी ग्रामपंचायतीमधील जमीन सुपीकता निर्देशांक याचे वाचन कृषि सहायकामार्फत शेतक-यांना समजावून सांगीतले. मौजे चिंचोली स. येथील शेतकरी काशिनाथ मेहेत्रे यांची कांदाचाळ पाहणी केली. मौजे निलंगा येथील शेतकरी गोविंद शिंगाडे यांचे २० हेक्टर क्षेत्रावरील रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन पेरणी केलेल्या क्षेत्राची पाहणी केली.

यावेळी उपस्थित तिन्ही मंडळ कृषि अधिकारी यांना मार्गदर्शन केले. भीमराव वैजनाथ पाटील यांनी पारंपारिक पाच फणी पेरणी यंत्राचा वापर करून मधला फण बंद करून सदरील बंद फणाच्या ठिकाणी नंतर सरी पाडण्याच्या तंत्राबदल कमी खर्चात केलेल्या पेरणी विषयी माहिती घेतली. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड केलेले शेतकरी यांच्यासोबत चर्चा केली. शेतकरी पटेल महताब यांनी स्वतः केलेले बहुपयोगी पावर टिलर खची करून त्याचे कौतुक यावेळी करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या