मुलुंडमध्ये नाल्यात आढळली मगर

a picture of a crocodile”

मुंबई  : मुलुंडमधील अमरनगर या भागात काही नागरिकांना नाल्यामध्ये मगर आढळून आल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ प्राणी मित्रांशी संपर्क केला. यानंतर प्राणीमित्र संघटना आणि वनाधिकाऱ्यांनी येथील जागेची पाहणी केली. या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा, गाळ असल्याने ही मगर दिसत नाही.

Loading...

यामुळे या प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेला ही माहिती कळवली. त्यांनी नाल्यातील हे पाणी आणि गाळ काढण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पालिकेचे कर्मचाऱ्यांनी पंप लावून हे पाणी उपसण्यास सुरुवात केली. मगरीला नाल्यातून काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.Loading…


Loading…

Loading...