मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी दूर व्हावं, असं वक्तव्य शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केले होते. तसेच रयत शिक्षण संस्थेत शिक्षक भरतीसाठी ४० लाख घेतले जातात यासह विविध भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले होते. केल्यामुळं साताऱ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जवळपास साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी दीड हजार पेक्षा जास्त कर्मचारी आणि सातशेहून अधिक शाखा असणारा रयतचा परिवार. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा कार्यभार पवार साहेब गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे सांभाळत आहेत परंतु पवार साहेबांवर 1/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 12, 2022
याबाबत रुपाली चाकणकर ट्विट करत म्हणाल्या, ‘जवळपास साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी, दीड हजार पेक्षा जास्त कर्मचारी आणि सातशेहून अधिक शाखा असणारा रयतचा परिवार. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा कार्यभार पवार साहेब गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे सांभाळत आहेत, परंतु पवार साहेबांवर टीका वैचारिक उंचीची करा. असली बालिश विधाने करून फक्त स्वतःच हसं करून घेता येतं.’
‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीत धरून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार केला. मुलांना शिक्षण मिळावे म्हणून कष्ट घेतले. त्याच गोष्टींना पुढे घेऊन जाण्याचे काम साहेब करत आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेची यशस्वी वाटचाल कदाचित आपल्याला पाहवत नसेल. पण हा महाराष्ट्राचा सह्याद्री रयत शिक्षण संस्थेला अजून पुढे घेऊन गेल्या शिवाय राहणार नाही हा मला रयतची विद्यार्थीनी म्हणुन विश्वास आहे!’ अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपला खोचक टोला
- शरद पवार पंतप्रधान होणार?, नवाब मलिकांनी दिले स्पष्टीकरण
- फडणवीस घरी गेले अन् मायकल लोबोंनी भाजपला सोडचिठ्ठी देत पत्नीसह काँग्रेस प्रवेश केला
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह
- पुन्हा-पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही; WHO चा इशारा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<