Saamana | मुंबई : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत आणि सोलापुरात अक्कलकोटवर दावा सांगितला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान होत असताना शिंदे गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सामना (Saamana) आग्रलेखातून एकनाथ शिंदे (Eknath shinde) सरकारवर घणाघात केला आहे.
यावेळी, खोके सरकारात जीव नाही की मनगटात सळसळ नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. अशा मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल, त्यातच सगळ्यांचे हित आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपच्या मवाळ धोरणावर सामनातून टीका करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर केलेल्या दाव्यांवर सरकार अद्याप शांत का आहे, असा खोचक सवाल देखील विचारण्यात आला आहे.
दरम्यान, बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प आहेत. सरकार वाचवण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत, असा टोमणाही लगावण्यात आलाय. एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका मंदिरात त्यांनी ज्योतिष्याला हात दाखवण्याची चर्चा रंगली आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | शिंदे गटातील ‘या’ आमदाराने केलं शरद पवारांचं कौतुक, राजकीय चर्चांना उधाण
- Uddhav Thackeray | “…तर महाराष्ट्र बंद करण्याचं देखील पाहू”, उद्धव ठाकरेंचा इशारा
- Deepak Kesarkar | “संजय राऊतांएवढं वाईट…”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर
- Sharad Pawar | शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीतील विश्वासू नेता करणार शिंदे गटात प्रवेश
- Hair Care Tips | वाढत्या पांढऱ्या केसांच्या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय