मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.
एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.
SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीका केली आहे. सध्या एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
जेल मधील पत्रलेखन हा संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे. असे काही पत्रलेखक इतरांना देखील मिळू शकतात.
एकंदरीत सर्व स्तरावर गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील हे सगळ्यात मोठे साडेतीन अती शहाण्यांचे कारस्थान दिसतेय.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) April 8, 2021
जेल मधील पत्रलेखन हा संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे. असे काही पत्रलेखक इतरांना देखील मिळू शकतात. एकंदरीत सर्व स्तरावर गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील हे सगळ्यात मोठे साडेतीन अती शहाण्यांचे कारस्थान दिसतेय असे देखील राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी पत्रक काढून उर बडवायला सुरवात केलीय’
- बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; दुसऱ्या दिवशीही दहा बळी
- बायोबबलमुळे परदेशी खेळाडूंची माघार : सौरभ गांगुली
- पंतप्रधान मोदींनी लसीचा दुसरा डोस घेताना मागच्यावेळी झालेली ‘ती’ चूक टाळली
- निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग