मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेशी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडली आहे. त्यातच या आमदारांनी मविआचा पाठींबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच सेनेचे अनेक नेते या बंडखोर आमदारांना समेटाची हाक देत आहेत. मात्र या मनशेमागे स्वार्थ असल्याचा टोला मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे.
‘काळजी’च्या नावाने उद्धव ठाकरे आणि पडद्यामागील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदारांना समेटाची हाक देत असल्याचे मनसेनी म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलेय कि, “एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याची घाण,रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?”
#काळजी#victimcard pic.twitter.com/zruTRZC0lt
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2022
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IRE vs IND 2nd T20 : आयर्लंडनं भारताला फोडला घाम..! हार्दिकसेनेचा २-० असा मालिकाविजय
- Maharashtra Crisis : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाखाली FIR नोंदवण्याची मागणी
- Special Session : 30 तारखेला राज्यपाल बोलावतील विशेष अधिवेशन? ठाकरे सरकारकडे फक्त उद्याचा दिवस!
- Devendra Fadnavis : ठाकरे-शिंदेंच्या सत्तासंघर्षामध्ये भाजप मैदानात! राज्यपालांना पत्र दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Maharashtra Crisis : भाजपकडून बहुमत चाचणीची मागणी, फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट! ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<