‘आयपीएल’च्या बससाठी रुग्णवाहिका थांबवल्याने पोलीसावर टिका; व्हिडीओ व्हायरल

आहमदाबाद : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

स्पर्धा रद्द होण्याआधी आयपीएलवर अनेकदा टिका होत होती. कारण एकीकडे देशात कोरोनाचे संकट ओढावले असताना क्रिकेट खेळाला महत्व दिल्याने अनेकांनी बीसीसीआय आणि आयपीएलला असंवेदनशील म्हणले होते. आता आहमदाबाद शहरातील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पोलीसांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या व्हिडीओत अहमदाबाद पोलिसांनी आयपीएलच्या बससाठी रुग्णवाहिका थांबवली होती.

अहमदाबाद शहरातील पंजरापोल चौकातली ट्राफिक जंक्शनवर एका आयपीएल फ्रँचायझीच्या बसला जाण्यासाठी पोलिस रस्ता मोकळा करताना दिसत आहेत. मात्र, दुर्दैव असे की या बससाठी मार्ग बनवताना एका रुग्णवाहिकेलाही प्रतिक्षा करावी लागली आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात वाहन चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे. केकेआर संघाच्या लागोपाठ ३ बसला जाण्यासाठी रस्ता बनवताना हा प्रकार घडला आहे. मात्र हा व्हिडिओ कितपत खरा आहे हे अस्पष्ट आहे. परंतु हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अहमदाबाद पोलिसांना धारेवर धरले आहे.

महत्वाच्या बातम्या