देवेंद्र फडणवीसांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर नाना पटोलेंची टीका

nana

मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले आहे. तेथे अनेक नेते दौरे करत आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेते यांनी देखील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी शिद्रुकवाडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. घर, शेतीचे नुकसान, जनावरे वाहून गेली. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची गरज आहे; असे ते म्हणले.

त्यावर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केलीय. काँग्रेसनं इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी फडणवीस आमच्या सायकल रॅलीला नौटंकी म्हणाले होते. आता त्यांचाही हा पूरग्रस्त भागाचा दौरा नौटंकी आहे का? असा सवाल पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर 4 दिवसांनी आपण पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारकडून दरड दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत काही निकष ठरवून पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या