झोपी गेलेले जागे झाले, महिला सुरक्षेवर भाजप महिला मोर्चाची टीका

मुंबई : कोव्हीड सेंटरमधील महिला सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही दिवसात महत्त्वाच्या मुद्दा बनला होता. औरंगाबादमधील कोरोना बाधीत महिलेकडे एका डॉक्टरने शरीर सुखाची मागणी केली होती. त्या नंतर त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन डॉक्टरचे निलंबन करण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारामुळे कोव्हीड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता.

त्यावर उपाय म्हणून २३ मार्च २०२१ रोजी राज्य सरकारच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार कोरोना केंद्रातील महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी नव्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयावर भारतीय जनता पक्षातील महिला मोर्चाच्या वतीने टीका करण्यात आली आहे.

यावर टीका करताना महिला मोर्चाने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘झोपी गेलेले जागे झाले.. संजय राठोड यांचा राजीनामा नंतर भाजप महिला मोर्चाच्या आक्रोश आंदोलनाला तसेच सतत मागणीला मिळाले यश. कॉविड सेंटर मधील महिला सुरक्षेसाठी शेवटी महाभकास आघाडी सरकार जागे झाले आणि महिला सुरक्षेबाबतची SOP जाहीर.’

महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याला महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणात राजीनामा द्याला लागला आहे. तर दुसरा एक मंत्री दुसऱ्या पत्नीच्या आरोपामुळे अडचणीत आला होता. आता पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते असलेले संजय राऊत यांच्यावरदेखील एका महिलेने आरोप केले आहेत. या मुळे हे प्रकरण लवकर शांत होईल, असे सध्यातरी वाटत नाही.

महत्त्वाच्या बातम्या