मुंबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास २१० आमदारांचे मतदान पार पडले आहेत. यात महाविकास आघाडी कडून ६ तर भाजपकडून ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० जागासाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे आता दहाव्या जागी महाविकास आघाडीचा विजय होतो का ? भाजप बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी निवडणुक प्रक्रियेवर भाष्य केले आहे.
भास्कर जाधव म्हणाले, मतदान प्रक्रिया आता संपत आली आहे. शिवसेना गटा – गटानं मतदान करत आहे ही गोष्ट खरी आहे. मागील वेळी काही उणिवा आमच्याकडून राहिल्या त्यामुळं भाजपचं फावलं आणि त्यांचा निवडून न येणारा उमेदवार ही निवडून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सर्व प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेऊन आहेत. विधानपरिषदेसाठी मतदानाचा कोटा आता सांगण्यापेक्षा, चार तास राहिले आहेत. मतमोजणीत मतांचा कोटा किती आहे ते कळेल,असं भास्कर जाधव म्हणाले.
भाजपचा पोकळ आत्मविश्वास आहे. बाहेर संभ्रम निर्माण करायचा, वातावरण निर्माण करायचा, हवा निर्माण करायची भाजपची कार्यपद्धती आहे. चार तासानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होईल, असेही भास्कर जाधव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :