मुंबई: उल्हासनगर शहरात दरोडा टाकण्याच्या इराद्यात असणाऱ्या सहा व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमधील एकजण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उल्हासनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील अटक केलेल्या आरोपींमध्ये एकजण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे कळते. गृहमंत्री आपले आसल्यामुळे दरोडा टाकण्याचा आपल्याकडे परवाना आहे, अशी धारणा राष्ट्रवादीमध्ये तयार झाली आहे काय? झाली असेल तर त्याला जबाबदार कोण गृहमंत्री साहेब?”, असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
दरम्यान अटक झालेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचे नाव सुधीर सिंह असून कॅम्प नंबर २ च्या हनुमान टेकडी परिसरात दुचाकी आणि रिक्षा घेऊन सुधीर सिंग आणि दहा ते बारा जण दरोडा टाकण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…असे कुण्या भाजपावाल्यांच्या घरात घुसल्याचे कधी दिसले नाही”, संजय राऊतांचा टोला
- शिवसेनेच्या दोन तोफ! संजय राऊत आणि दीपाली सय्यद यांचा अयोध्येतील PHOTO व्हायरल
- “या देशात नेहरू-गांधी नावाचे काही शिल्लक ठेवायचे नाही असा…”, संजय राऊतांचा भाजपवर आरोप
- IPL सामन्यांतील उलाढालीमागे कोण होते?; संजय राऊत यांचा भाजपला सवाल
- “विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यू’च्या कत्तली केल्या तसे…”, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<