माजी आयपीएस सुरेश खोपडें चे विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप

ips nagare patil vr suresh khopade

सातारा : तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात बसवलेला कबुतराचा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काढल्यामुळे वातावरण चांगलच तापल आहे. सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वास नांगरे पाटलांवर आरोप केले आहेत. २००२ साली सातारा पोलीस मुख्यालयाबाहेर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी शांततेचं प्रतीक म्हणून कबुतराचा पुतळा बसवला होता. व्हीआयपींच्या गाड्यांना अडथळा हे कारण पुढे करत विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून तो काढण्यात आला.

काय म्हणाले सुरेश खोपडे ?

”मुंबईतील २६/११ हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण झाली तेव्हा एक लेख लिहिला होता. समुद्रामार्गे दहशतवादी मुंबईत येत असल्याची माहिती आयबीने दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, याचा जाब त्या विभागाच्या विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना विचारला होता. जेणेकरुन अंतर्गत सुरक्षा आणखी मजबूत करता येईल. मात्र, याचाच राग मनात धरुन मी राज्यभरात विविध ठिकाणी बसवलेले पुतळे काढण्यात येत आहेत,” असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला.

९ फेब्रुवारीला सुरेश खोपडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली होती

पोलीस ‘शांती दूत’ कि ‘कर्दन काळ’
1999 साली माझी पोलीस अधीक्षक सातारा म्हणून नेमणूक झाली .शिवरायांच्या कर्म भूमीत sp म्हणून काम करणे पोलीस दलात मोठे भूषणाव असते .तिथले पोलीस कर्मचारी जेव्हढे मेहनती व जीवाला जीव देणारे तेव्हडीच जनता, प्रसार माध्यमे ,लोकप्रतिनिधी हे कायद्याचा आदर करणारी ,जनताभि मुख अधिकाऱ्याला सहकार्य करणारी ,आदर तिथ्य शील आहेत तशीच निर्भय व बानेदार सुद्धा आहेत.हे मी स्वतः अनुभवले आहे.

पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयाची दगडी बांधकामातील भव्य,सुंदर ऐतिहासिक इमारत आहे .माझ्या वेळी या इमारती समोर प्रचंड मोठ्या अश्या कांही बिडात व पितळात बनविलेल्या ऐतिहासिक तोफा ओळीने शत्रू सैनिका वर डागलेल्या व रोखून ठेवलेल्या अवस्थेत सज्ज दिसत. कांहींना ते चांगले वाटे मला मात्र कार्यालयात प्रवेश करताना त्या तोफा पाहून विसंगत व कालबाह्य वाटत. त्याच काळात पोलीस दल प्रभावी व परिणाम कारक कसे बनविता येईल या बद्दल माझे संशोधन चालू होते. पोलीस कार्य पद्धती जशी कालबाह्य तशीच पोलिसांची प्रतिकेही कालबाह्य झालेली आहेत .तोफा किल्ल्यावर योग्य ठरतील ,पण सामाजिक आर्थिक दुबल्या ,अल्पसंख्यांक ,नाडलेल्या जनतेला न्याय देणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या दारात तोफा कश्याला ! तोफा हे दडप शाहीचे प्रतीक आहे !! खोट्या केस मध्ये फलटण फोउजदाराने पकडलेल्या पारध्याच्या पोराची आई किंवा कोयना नगरच्या लाकूड तोडीच्या खोट्या आरोपा खाली पकडलेल्या आदिवासी महिलेला स्थानिक फोऊजदार विरुद्ध न्याय मागण्यासाठी sp कडेच जावे लागते. अशी माणसे कार्यालयासमोरील या तोफा पाहून हादरून जातात. तोफा हे सरंजामदारि व दडप शाहीचे प्रतीक आहे म्हणून मी त्या तोफा हटविल्या. सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय हे दिन दुबळ्या शोषित जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्या साठी आहे ! दडप शाही करण्यासाठी नव्हे! म्हणून त्या ठिकाणी शांतता व सुरक्षिततेचे प्रतीक असलेले ‘शांती दूत’ हे प्रतीक बसविले.

आम्हा पोलिसांचे दर वर्षी आर्म फायरिंग प्रॅक्टिस घेतले जाते .माणसाच्या कम्बर ते माने पर्यंतच्या टार्गेट वर बुल वर(हृदयावर) अचूक गोळी मारणारास पैकीच्या पैकी मार्क मिळतात. असा सराव माणसे मारण्यासाठी नव्हे त्यांचे संवरक्षणासाठी केला जातो म्हणून त्याच पुंगल्या वितळवून आम्ही प्रचंड मोठे व आकर्षक शिल्प बनविले. सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून ते बसविले होते . गेले 18 वर्ष ते दिमाखात उभे होते . काल रात्री मात्र त्या निर्जीव ,निरुपद्रवी कबुत्रावर कोल्हापूरच्या शूर IGP नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात पोकलंड, गॅस कटरच्या साह्याने हल्ला चढविला.आणि पहाटे पर्यंत काम फत्ते झाले!!

एक निर्जीव पक्षी मारल्याचे माझ्या सह सर्व साताराकराना दुःख झाले .पूर्व सूचना न देता, जनतेचीतक्रार नसता एव्हड्या गनिमी काव्याने केलेल्या कारवाईचे समाधान कारक उत्तर कुणीही दिलेले नाही. खरे तर पानसरे व दाभोलकर हिआमची हिमालया एव्हडी माणसे संपविली ती नांगरे पाटलाच्या हद्दीत राहणारी. शौर्य दाखवायचे तर नांगरे पाटलांनी आम्हाला वणंदनिय असलेल्या पानसरे व दाभोलकर यांच्या खुन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोकलंड व कटर सह हल्ला करून दाखवावा !अन्यथा तो शांतिदूत पूर्वीच्या ठिकाणी लावावा! जो दिन दुबल्याना सुरक्षिततेचे वचन देतो व पोलीस दल व एकूणच प्रशासकीय सुधारणांचे प्रतिमात्मक रणसिंग फुंकतो !

शांती दूत हटविल्याने सातारा मधील सर्व थरातील जनतेच्या भावना अत्यन्त तीव्र आहेत म्हणून मी IGP नांगरे पाटलांना नम्र विनंती करतो की त्यांनी शांती दूत पूर्वीच्याच ठिकाणी समारंभ पूर्वक ठेवावा . अन्यथा एक भारतीय नागरिक म्हणून त्यांना बजावू इच्छितो की एक नोकरशहा किंवा सरकार जनतेच्या भावनेवर कायद्याचा धाक दाखवून पोकलंड व कटर फिरवू शकते .पण ठरवले तर भारतीय जनता बुलडोझर फिरवू शकते, त्यात नोकरशहाच काय पण सरकार हि कोसळते !!
सुरेश खोपडे.