आयपीएल २०२१च्या उर्वरीत स्पर्धेवर आयसीसीमुळे ओढावले संकट, केली ‘ही’ मागणी

मुंबई : मागील महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली. यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगु लागल्या होत्या. मात्र २९ मे रोजी बीसीसीआयने बैठक बोलावुन आयपीएल स्पर्धेचे उर्वरीत सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे आयोजीत करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर बीसीसीआयचे अधिकारी दुबईला पोहोचले असुन ते स्पर्धेच्या पुर्वतयारीला लागले आहे. नुकताच बीसीसीआयने या स्पर्धेचे वेळापत्रक ठरवले आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएल १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. मात्र या वेळापत्रकारवर आयसीसीने आक्षेप घेतला आहे. आयसीसीने मागणी केली आहे की आयपीएल स्पर्धा ही १० ऑक्टोबर पर्यंत संपुष्टात आणावी. कारण आयसीसीने १८ ऑक्टोबरपासुन टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचे योजले आहे.

जर आयपीएल स्पर्धा १५ ऑक्टोबर पर्यंत चालली तर तीन दिवसातच टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होईल त्यामुळे ही आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना हा १० ऑक्टोबर रोजी आयोजीत करावा अशी मागणी आयसीसीने बीसीसीआयकडे केली आहे. यादरम्यान आगमी टी-२० विश्वचषक स्पर्धा कुठे होणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. जर भारतातील कोरोना परिस्थीती सुधारली नाही तर युएई मध्ये ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP