कॉंग्रेसकडून ऐनवेळी धोका ; सेनेच्या मनसुब्याला सुरुंग

blank

टीम महाराष्ट्र देशा : ” कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची घटक पक्षांशी चर्चा सुरु आहे. शिवसेनेला पाठींबा द्यायचा की नाही याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. सविस्तर चर्चा करून दोन्ही पक्ष एकत्रच निर्णय घेतील अशा प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या आहे. कॉंग्रेसने पाठींबा न दिल्याने आता शिवसेनेची कोंडी अधिकच वाढली आहे.

त्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे तर राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरु असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान शिवसेना कॉंग्रेस आघाडीच्या पाठींब्याने सरकार स्थापनेचा दावा करणार होती. मात्र काँगेसचा पाठींबा मिळाला नसल्याने शिवसेनेला सरकार स्थापनेचा दावा करता आलेला नाही. याबाबत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला वेळ होता मात्र कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे इतर पर्यायी दोन पक्षांचा पाठींबा घेत शिवसेनेने आज सरकार स्थापनेचा दावा केला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यपालांकडे सादर केले आहे. मात्र इतर दोन पक्षांना या प्रकियेला वेळ लागत असल्याने शिवसेनेने वेळ वाढवून मागितली आहे. मात्र ही मुदत वाढवून देण्यासाठी राज्यपालांनी नकार दिला आहे. मात्र शिवसेनेचा दावा राज्यपालांनी ग्राह्य धरले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पाठींबा न दिल्याने आता शिवसेना यावर काय भूमिका राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :