सराईत गुन्हेगार खरेदीच्या बहाण्याने आले मंगळसुत्र हिसकावुन पळाले

beed chori

औरंगाबाद : खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानदार ७५ वर्षीय महिलेच्या गळयातील दीड तोळ्याचे मंंगळसुत्र हिसकावुन पळ काढल्याची घटना आज दुपारी अरिहंतनगरात घडली. मंगळसुत्र हिसकावणारे चोरटे हे रेकार्डवरील गुन्हेगार असुन ते कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवाहरनगर परिसरातील अरिहंतनगर मधील चंपाबाई पुनमचंद पाटणी (७५) या आज दुपारी त्यांच्या अरिहंत जनरल स्टोअर्स मध्ये बसलेले होते. दुपारी तीनच्या सुमारास पल्सर दुचाकीवर २५ ते ३० वर्षवयोगटातील आलेल्या तरूणांनी चंपाबाइ यांना सुट्टे मागितले. त्यांनी सुट्टे पैसे नसल्याचे सांगितल्याने थोड्या वेळानंतर एक तरूण दुकानात आला आणि त्याने फ्रेंडशिप बॅन्डची मागणी केली. चंपाबाइ या उठुन बॅन्ड काढत असताना त्याने चंपाबाइ यांच्या गळयातील दीड तोळयाचे मंगळसुत्र हिसकावुन पळ काढला. चंपाबाइ यांनी आरडाओरड केली तो पर्यंत चोरट्यांनी काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शशीकांत तायडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सिसिटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून यात दोन चोरटे हे अडकले आहे. दोन्ही चोरटे हे रेकार्डवरील गुन्हेगार असल्याचे उपनिरिक्षक तायडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या