कचरा प्रश्न औरंगाबाद: आंदोलकांवर दाखल केले हत्येच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे

कचरा प्रश्नांवरून औरंगाबाद मध्ये करण्यात आले होते आंदोलन

औरंगाबाद: कचरा प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कचरा प्रश्नांवरून औरंगाबाद मध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
औरंगाबादमधील पडेगाव मिटमिटामध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत ३ अधिकारी आणि ९ पोलीस कर्मचारी जखमी झाले, दरम्यान अनेक तोडफोडीच्या घटना घडल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. या घटनेमुळे महामार्गावर वाहन्यांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. यातील ५ ते ६ खासगी गाड्याही ग्रामस्थांनी फोडल्या.

आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे
१४९ – समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल जमावाचा प्रत्येक घटक समान दोषी असणे
३०७ – जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे
१४८ – प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे
१४७ – दंगा करण्याबद्दल शिक्षा
१४३ – बेकायदेशीर जमावाचा घटक असल्याबद्दल शिक्षा
३२४ – घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे
४३६ – घर इत्यादी बद्दल विस्तव अथवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक
४२७ – पन्नास रुपये इतक्या रकमेचे नुकसान करुन आगळीक करणे
३४१ – गैरनिरोधबद्दल शिक्षा (वाट अडवल्याबद्दल)
४३५ – १०० रुपये किमतीपर्यंत अथवा शेतमालाच्या बाबतीत 10 रुपये किमतीपर्यंत विस्तव अथवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक
३५३ – लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी बलप्रयोग अथवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे

You might also like
Comments
Loading...