fbpx

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे

vinod tawade

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करू असा इशारा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेणे बेकायदेशीर असून, महाविद्यालयांनी ५० टक्के पेक्षा जास्त शुल्क आकारु नये, असे आदेश सर्व महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना यापूर्वीच दिले आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे

शिक्षण शुल्काच्या केवळ ५० टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांकडून घ्यावी अन्य ५० टक्के रक्कम सरकार देणार आहे. परंतु काही महाविद्यालयांमध्ये १०० टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा संस्थांविरुध्द नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे तावडे यांनी सांगितले.

दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार : विनोद तावडे

राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार – विनोद तावडे