रावण सेना टोळीच्या म्होरक्याची निगडीत निर्घृण हत्या

Ravan-sena,aniket jadhav

पिंपरी चिंचवड : पिंपरीतील सराईत गुंड अनिकेत जाधवची हत्या झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात सोमवारी मध्यरात्री अनिकेत जाधव या गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. रावेत, आकुर्डी या परिसरात टोळीची दहशत होती.
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र अद्याप ठोस कारण समोर आले नाही.  अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले, त्यानंतर डोक्यात दगड घातले आणि अनिकेतची हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेत वर दगडाने आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. ही हत्या पूर्ववैनस्यातून झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांनी दिली. अनिकेतवर अनेक गुन्हे दाखल आहेत.महिनाभारापूर्वी त्याने आकुर्डीच्या रमाबाई वसाहतीमध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर अनिकेत जाधव फरार होता. मात्र, काल रात्री अचानकपणे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्यामागे महाकाली टोळीचा हात असावा, असा पोलिसांनी संशय आहे. सध्या निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.