करमाळ्यात डाक कर्मचाऱ्यावर गावगुंडाचा प्राणघातक हल्ला

post logo

करमाळा प्रतिनिधी;दुसऱ्याचे टपाल परस्पर परत पाठव असा आग्रह धरणाऱ्या गावगुंडाचे न ऐकल्याने पोस्ट कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील कोंढेज येथे घडला आहे. या प्रकरणी पोस्टमन पांडुरंग रंगनाथ पाठक( रा. कोंढेज. ता, करमाळा ) यांच्या तक्रारीनुसार मधुकर दशरथ लोंढे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्टात सध्या कर्मचारी वर्ग कमी असल्याने अतिरिक्त काम इतर कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. पांडुरंग पाठक हे ब्रँच पोस्ट मास्तर या पदावर काम करत आहेत. त्यांच्यासोबत काम करणारे पोस्टमन रिटायर झाले आहेत. नवीन पोस्टमन नसल्याने पाठक यांना वाटपाचे देखील काम करावे लागत आहे. 13 सप्टेंबर रोजी वाटपाचे काम करून येत असताना मधुकर दशरथ लोंढे (वय८५) यांनी लोंढे वस्तीजवळ अडवून ‘माझ्या काही रजिस्टर व पावत्या आल्या आहेत का अशी विचारणा केली’ तेव्हा पाठक यांनी नाही असे सांगितले. तेव्हा मधुकर लोंढे याने सुभद्रा गुंडगिरे यांचे जर काही टपाल अथवा रजिस्टर असे काही आले तर माझ्याकडे देत जा अन्यथा परस्पर माघारी पाठवत जा असं सांगू लागला. मात्र, नियमानुसार असं करता येत नाही असं सांगताच लोंढेने पाठक यांना लोखंडी गजाने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. स्थानिक नागरिक पाठक यांच्या मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading...

मधुकर लोंढे याने यापूर्वी देखील बऱ्याच जणांवर असाच प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. वासुदेव एकनाथ खत्री या रिटायर मुख्याध्यापकावर तसेच तहसील कचेरीतील एका क्लर्क वर देखील लोंढेने हल्ला केला होता. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार