वसईत अल्पवयीन बहिणीचा सौदा; दोघा बहिणींसह दलालाला अटक

वसई : पैशाच्या हव्यासापोटी मीरा रोडमधील दोन सख्ख्या बहिणींनी अल्पवयीन धाकट्या बहिणीचा दीड लाखांसाठी सौदा केल्याची घटना घडली आहे. येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेतर्फे पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून दोघा बहिणींसह दलालाला अटक करण्यात आली आहे. दोन बहिणी त्यांच्या लहान बहिणीचा सौदा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी खोटा ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा हा सौदा उघडकीस आला. या दोघी बहिणी व दलालाला व्यवहार करताना ताब्यात घेण्यात आले.

You might also like
Comments
Loading...