आवाजही न वाढवता केला गुन्ह्याचा उलगडा, औरंगाबाद पोलिसांची कामगिरी!

आवाजही न वाढवता केला गुन्ह्याचा उलगडा, औरंगाबाद पोलिसांची कामगिरी!

Aurangabad Police

औरंगाबाद : गुन्हेगारांना त्यांचीच भाष कळते, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, सर्वच गुन्हे हे मुद्दाम किंवा ठरवून केलेले नसतात. त्यामुळे पोलिसांनाही प्रत्येक गुन्ह्याच्या वेळी वेगळी भूमीका घ्यावी लागते. असाच काहीसा प्रकार औरंगाबादमधील राजन शिंदे यांच्या खुनाच्या तपासाच्या वेळी समोर आला आहे. संशयीताशी बोलताना धमकी तर सोडा, साधा आवाजही न वाढवता या गुन्हाचा उलगडा केला असल्याचा दावा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे.

शहरातील मौलाना आजाद महाविद्यालयात प्राध्यापक असलेले राजन शिंदे यांचा त्यांच्याच घरात खुन करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले होते. या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना आठ दिवस लागले. मात्र, या सर्व काळात संशयीत अल्पवयीन असल्याचा संशय होता. त्यामुळे जराही आवाज न वाढवता, अतिशय संयमाने पोलिसांनी पूर्ण प्रकरण हाताळले असल्याचे पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

या प्रकरणातील विधी संघर्ष ग्रस्त बालकाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्या आदेशान्वये त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली असल्याचेही गिऱ्हे यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या