fbpx

गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा , पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांचा इशारा

पुणे : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी मावळत्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून आज पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारताच व्यंकटेशम यांनी गुन्हेगारांनी गुन्हेगारी सोडावी हाच आपला संदेश असल्याचं म्हंटले आहे.

नागपूर शहराला पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलेले के व्यंकटेशम यांची चार दिवसांपूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. आज त्यांनी पुण्यामध्ये पोलीस आयुक्त कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी सांस्कृतिक राजधानीत आल्याचा आनंद झाल्याचं सांगितले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रच्या सांस्कृतिक राजधानीत आल्याच आंनद आहे, आजवर पुण्यात सुरू असणारे बडीकॉप पोलीस यंत्रणा चांगली आहे. ती यापुढे देखील चालू ठेवली जाईल.

सेंट्रल कंपोस्टींगसाठी जागा निश्चित

६ ऑगस्ट पासून मनसेचे मल्टिप्लेक्समध्ये रिऍलिटी ‘कान’ चेक