काळ्या बाहुलीला फोटो लावून ठोकला झाडाला खिळा, भानामतीचा भंयकर प्रकार उघड

blank

लोणावळा : लोणावळा तुंग गावातील इसार शाळेजवळ असलेल्या एका झाडावर मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित नऊ जणांच्या फोटो वर जादूटोणा भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. जादूटोणा करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती तसंच तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अशोकाच्या एका झाडाला ९ जंणाचे फोटो खिळ्याने ठोकून त्यावर लिंबु,काळ्या बाहुल्या,बिबा टाचण्या लाउन भानामती सारखा अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत झाडाला लावलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो वरील लिंबू टाचण्या बाहुल्या काढून टाकल्या आहेत. या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संबंधित व्यक्तींनी तक्रारी अर्ज दिला असून असे कृत्य करणाऱ्या वर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

निर्जनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने मागचा असा खोडसाळपणा करणारा सूत्रधार कोण आहे, हे शोधण्याचे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलिसांना करावे लागणार आहे.

या व्यक्तींवर करण्यात आली काळी जादू

पांडुरंग कृष्णा जांभुळकर

संदिप एकनाथ पाठारे

किसन बंडु ठोंबरे

योगेश घाडगे

संजय कोकरे

संतोष हघारे

कश्वर शेख

अजय मेहता

मनोज सेनानी

महत्वाच्या बातम्या