‘क्राईम मास्टर गोगो’ परत येतोय, श्रद्धाने केली पोस्ट शेअर

मुंबई : बॉलीवूडने ९०च्या दशकात अनेक अविस्मरणीय चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘अंदाज अपना अपना’. हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला त्यावेळी बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट अपयशी ठरला. मात्र आज हा चित्रपट एक क्लासिक विनोदीपट म्हणून प्रसिद्ध आहे.

अमिर खान आणि सलमान खान या दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी याच चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळाली. या दोघांनी साकारलेले अमर-प्रेम हे दोन्ही पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. याच चित्रपटात आणखी एक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिले ते म्हणजे ‘क्राईम मास्टर गोगो’. अभिनेता शक्ति कपुरने हे पात्र साकारले होते.

काही दिवसापुर्वी शक्ति कपुरची मुलगी बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपुरने एक व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत श्रद्धा घरात नखांना नेलपॉलीश लावत असते इतक्यात तिच्या मागुन ‘क्राईम मास्टर गोगो’च्या वेशात शक्ति कपुर पुढे येतो. तेव्हा श्रद्धा त्याला बापु म्हणते, मात्र शक्ति कपुर म्हणतो नाही मी आहे क्राईम गोगो, आणि तो श्रद्धाची नेलपॉलीश घेऊन पळुन जातो. तेव्हा श्रद्धा म्हणते हॉटस्टारला काय गरज होती क्राईम मास्टर गोगोला परत घेऊन येण्याची. श्रद्धाच्या या पोस्टवरुन असे समजते की क्राईम मास्टर गोगो के पात्र प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP