डॉ मेधा खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा- ब्राम्हण महासंघ

ब्राह्मण महिला असल्याचा बनाव करून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ मेधा खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेवून हे प्रकरण सामोचाराने मिटवावे अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली आहे .

ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा विचित्र प्रकारात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने हा विरळात विरळा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सध्या या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भूमिका महाराष्ट्र देशाने जाणून घेतली . सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून त्याचा जातीशी काहीही संबंध नाही तसेच फसवणुकीचा जो गुन्हा वयोवृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला त्यांच्या वयाचा विचार करता खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे हि आमची भूमिका असल्याचं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितलं .