fbpx

एकदिवसीय मालिकेचा थरार, धोनीच्या विक्रमाकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वन-डे सामना आज नाॅटिगहॅम मध्ये खेळवला जाणार असून भारताने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाने यापूर्वीच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाचा 6-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यातील पहिली वन-डे असून याकडे क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागून आहे. या मालिकेत माजी कर्णधार धोनीला तीन विक्रमाला गवसणी घालण्याची संधी असणार असून धोनीला 10000 चा टप्पा पार करण्याची संधी आजच्या वन-डे सामन्यात आहे. धोनीने आतापर्यंत 318 वन-डे सामन्यात 9967 धावा केल्या असून त्याला 10000 चा टप्पा पार करण्यासाठी 33 धावा दूर आहे. जर त्याने हा टप्पा पार केला तर अशी कामगिरी करणारा तो जागातील 12 वा फलंदाज ठरेल. दहा हजार धावा पूर्ण करणारा भारताकडून चौथा खेळाडू ठरणार आहे. याआधी सचिन, सौरव आणि द्रविडने ही कामगिरी केली असून जर आज होणाऱ्या सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली आणि धोनीने 33 धावा केल्यास तो दिग्गजांच्या पंक्तीत बसेल.

आतापर्यंत एम एस धोनीने 318 सामन्यात यष्टीमागे 404 फलंदाजांना बाद केले असून यामध्ये 107 स्टपिंग आणि 297 झेल घेतले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात धोनीने यष्टीमागे तीन झेल घेतल्यास त्याचे 300 झेल होतील. जर त्याचे 300 झेल झाले तर तो अॅडम गिलख्रिस्ट(417), मार्क बाउचर(402) आणि कुमार संगाकारा(383) यांच्या पंक्तित जाऊन बसेल.

वन-डेमध्ये इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची धोनीकडे संधी असणार आहे. हा विक्रम युवराजसिंगच्या नावावर आहे. युवराजने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 1523 धावा केल्या असून दुसऱ्या क्रमांकावर 1455 धावांसह सचिन तेंडुलकर आहे. या दोघांचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला 98 धावांची गरज आहे. या मालिकेत धोनीने 98 धावा केल्यास इंग्लंडविरुद्ध वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो. भारतीय वेळेनुसार पाच वाजता सामना सुरु होईल.

आजचा संघ

भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल राहुल, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड :- ईयोन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टा, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बाल, टॉम कुरेन, अॅ0लेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशीद, डेविड विली, मार्क वुड.

अखेरच्या सामन्यात भारताचा विंडीजवर ‘विराट’ विजय

हा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू