चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्या पेक्षा काहीतरी करून दाखवण्याची वेळ

जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि हरियाणा मधील बाबा राम रहीमच्या भक्तांनी घातलेला धुडगूस यावर गौतम गंभीर ने ट्वीटच्या माध्यमातून निशाना साधला आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्या पेक्षा काहीतरी करून दाखवण्याची वेळ असल्याचं देखील त्याने म्हटलं आहे .
गौतम गंभीर नेहमीच ट्वीटच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर भाष्य करत असतो . आज केलेल्या ट्वीटमध्ये त्याने सध्या सुरु असलेल्या बाबा राम रहीमच्या भक्तांनी घडवून आणलेला हिंसाचार तसेच नुकत्याच पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केल आहे . याआधी देखील गंभीरने राम रहीमला अटक झाल्यानंतर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या
गौतम गंभीर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो
 ‘बॉर्डर पर टेररिस्ट, अंदर बाबा रेपिस्ट और हम उलझे हैं सिनेमा हॉल में नेशनल एंथम बजाने के लिए, वक्त है कुछ करने का’.