fbpx

सेहवाग भाजपकडून लढणारचा फुसका बार फुटला, निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार

टीम महाराष्ट्र देशा : 2014 मध्ये मी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या, आता 2019 मध्येही असेच होत आहे. मात्र मी तेव्हाही राजकारण प्रवेशास उत्सुक नव्हतो आणि आताही नाही. बात खतम म्हणत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने राजकीय प्रवेशाच्या बातम्यांना ब्रेक लावला आहे.

वीरेंद्र सेहवाग हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून तो हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे सेहवागचे फॅन्स देखील तो खरचं राजकारणात उतरणार का याबाबद्दल उत्सुक होते.

दरम्यान आज ट्वीट करत वीरेंद्रने राजकीय प्रवेशाचे वृत्त म्हणजे ‘नो बॉल’ असल्याचे स्पष्ट केले आहे. काही गोष्टी कधीच बदलत नसतात. अफवांचंही तसंच आहे. २०१४ मध्येही अगदी अशाच अफवा उठल्या होत्या. २०१९मध्ये पुन्हा तेच सुरू झालंय. विशेष म्हणजे त्यात काही नाविन्यही नसल्याचं ट्वीट सेहवागने केले आहे.

1 Comment

Click here to post a comment