fbpx

मुंबई : क्रिकेटपटू राकेश पवारची हत्या पूर्ववैमनस्यातून?

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईमध्ये गुरुवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली आहे. भांडूपमधल्या एका तरुण क्रिकेटपटूची तिघांनी हत्या केली आहे. राकेश पवार असं मृत क्रिकेटपटूचं नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राकेशची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिन्ही मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. तिन्ही आरोपी राकेशच्या ओळखीचे असून सर्वजण याच परिसरात राहतात. त्यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरू होता. राकेशच्या भावाचा अपघात झाला होता. हा अपघात या तिघांनीच घडवून आणल्याचा आरोप राकेशने केला होता. यावरून त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

राकेश पवार हा गुरुवारी रात्री आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. वाटेत ३ जणांनी त्याला काहीतरी कारण काढून थांबवलं. अडवणारे तीनही जण राकेशच्या ओळखीचेच असल्याची माहिती आहे. या तीन जणांनी चाकूने भोसकून राकेशची हत्या केल्याची माहिती आहे. या हत्येनंतर भांडूपमध्ये खळबळ उडाली आहे.