क्रिकेटर मोहम्मद शमीला टोळक्याकडून शिवीगाळ मारहाणीचा प्रयत्न

वेबटीम: टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला एका टोळक्यांनी शिवीगाळ करत घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना  समोर आली आहे. या टोळक्याकडून त्याच्या बिल्डिंगमधील सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली आहे . याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून चार जणांना अटक करण्यात आली.

मोहम्मद शमी त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत शनिवारी रात्री बाहेरून घरी परतत होते. त्याचवेळी कार पार्किंग दरम्यान एका दुचाकी चालकाशी शमीच्या ड्रायव्हरशी बाचाबाची झाली.त्यानंतर या दुचाकी चालकाने थेट शमीला शिवीगाळ कण्यात सुरूवात केली. बराच वेळ हा वाद सुरू होता.त्यानंतर दुचाकी चालक तिथून निघून गेला. पण थोडय़ाच वेळाने आणखी तिघांता सोबत घेऊन तो युवक शमीच्या बिल्डिंगमध्ये परत आला.