ती भारतीय महिला क्रिकेटपटू बनणार डीएसपी

भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जरी पराभूत झाला असला तरी या संघावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात रोख रकमेबरोबर खेळाडूंना विविध पदावर नोकऱ्यांच्या घोषणा देखील केल्या जात आहे.

भारताकडून उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीत जबदस्त कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर असाच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंजाब सरकारने तिला पंजाब पोलीस दलात डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस या पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. त्यात ते म्हणतात, ” आम्हाला हरमनप्रीत कौरचा अभिमान वाटतो. भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंड संघाविरुद्ध जबदस्त संघर्ष केला. आम्ही हरमनप्रीत कौरला पंजाब पोलीस दलात डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस या पदावर नोकरी देण्याची घोषणा करतो. ”