तो मी नव्हेच,आक्षेपार्ह ट्वीटबाबत हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा- भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात जोधपूरच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पण ते ट्विट हार्दिकने केलंच नव्हतं अशी नवी माहिती आता समोर येत आहे. हार्दिक पांड्याने स्वत या स्पष्टीकरण दिले आहे.
त्या ट्विटमध्ये काय म्हटलं होतं ?
कोण आंबेडकर ?, ज्यांनी देशाच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि देशाला आरक्षण नावाचा आजार दिला.

याचिकाकर्ते डी. आर. मेघवाल यांचा नेमकं काय म्हणणं आहे ?
एखाद्या क्रिकेटपटूनं अशा प्रकारची टिप्पणी करणे हा तर संविधानाचा अपमान आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी दलित बांधवांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असंही मेघवाल यांनी याचिकेत नमूद केलं आहे. हार्दिक पांड्याच्या या ट्विटबाबत मला जानेवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली. हार्दिक पांड्याची ही टिप्पणी म्हणजे दलित बांधवांच्या भावना भडकावण्याचाच एक प्रकार असल्याचंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण
‘‘मी अशा प्रकारचं कोणतंही ट्विट किंवा वक्तव्य ट्विटर किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी केलेलं नाही. माझं नाव आणि फोटो वापरत बोगस अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. मी संपर्क साधण्यासाठी फक्त माझ्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा वापर करतो. आणि ज्या ट्विटवरुन गदारोळ सुरु आहे ते मी असल्याचं भासवत बोगस अकाऊंटवरुन करण्यात आलं आहेमाझ्या मनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आहे. मी त्यांचा अनादर होईल असं काहीच करण्याचा विचारही करु शकत नाही’, असंही हार्दिक पंड्याने म्हटलं आहे. आपण न्यायालयात यासंबंधी पुरावे सादर करु अशी माहिती पंड्याने दिली आहे.

दरम्यान @hardikpandya7 हे हार्दिक पांड्याचं अधिकृत ट्विटर हॅंडल आहे, पण ज्या ट्विटवरून पांड्या अडचणीत आला ते ट्विट @sirhardik3777 या पॅरोडी अकाउंटवरून करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कोर्टात तक्रार देखील @sirhardik3777 याच अकाउंटविरोधात करण्यात आल्याची माहिती आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली होती.

You might also like
Comments
Loading...