रंगभेद करणाऱ्यांना क्रिकेटर अभिनव मुकंदने सुनावले

वेबटीम : कसोटीपटू अभिनव मुकुंदने रंगभेदभेदावर टिप्पणी करणाऱ्यांनासोशल मिडियावर नेटीझन्संना चांगलेच सुनावले आहे. अभिनवने ट्विटरच्या माध्यमातून रंगभेदावरून टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले.अभिनव मुकुंद याने श्रीलंके विरोधात पहिलीच टेस्ट खेळताना ८१ रन बनवले होते.

‘मी वयाच्या 15 वर्षापासून परदेश दौरे करत आहे. जेव्हापासून तरूण झालो तेव्हा हे लक्षात येत नाही की लोकांना माझ्या त्वचेच्या रंगावरून अपमान करण्यात काय मजा वाटते’, असे अभिनवने ट्विट केले आहे.

पुढे तो म्हणाला, ‘मी उन्हात खुप क्रिकेट खेळलो आहे. पण मला माझ्या रंगावरून एकदाही वाईट नाही वाटले कारण, मला मी जे करतो ते आवडते परंतु जे लोग सोशल मिडीयावर माझ्यासारख्या लोकांवर त्यांच्या रंगावरून टीका करतात त्यांचे विचार बदलायला हवे, तसेच या ट्विटचे राजकारण करू नये असे देखील त्याने सांगितले आहे. या ट्विट नंतर अभिनवला त्याच्या फैन्सनी पाठींबा दर्शवला आहे.