भारत- नेपाळचे संबंध सुधारण्यासाठी खेळाची महत्वाची भूमिका – नरेंद्र मोदी

काठमांडू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून उसंत मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारत नेपाळ बस सेवेचे उद्घाटन केले ही बस सेवा सीतेचे माहेरघर नेपाळमधील जनकपुर ते सासर भारतातील अयोध्या या दोन स्थानकांदरम्यान ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

bagdure

दरम्यान भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा वापर करण्यावर भर देण्याचे संकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेपाळ दौऱ्यामध्ये दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या भूमिकेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. तसेच दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगितले.

ते म्हणाले, ‘आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आयपीएलमध्ये नेपाळचा खेळाडू खेळत आहे.’ दिल्लीकडून संदीप लामिछाने हा नेपाळचा क्रिकेटपटू खेळत आहे. याचाच उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. फिरकीपटू लामिछाने हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चमकला होता. मोदी म्हणाले, ‘क्रिकेटच्या माध्यमातून लोकांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर अन्य खेळांच्या माध्यमातूनही या दोन देशांदरम्यान चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.’

You might also like
Comments
Loading...