दादाचा विराटला लाखमोलाचा सल्ला

दिल्ली :  पहिल्या कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडने ३१ धावांनी पराभव करत मालिकेत १ – ० ने आघाडी घेतली. विराट कोहलीने दमदार फलंदाजी करताना पहिल्या डावात १४९ आणि दुसऱ्या डावात ५१ धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. विराट कोहलीने एकाकी झुंज देत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र कोहलीला अन्य फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे सामन्यात भारताला पराभव पहावा लागला.

त्यानंतर अनेक दिग्गजांनी विराट कोहलीच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पुढील कसोटीत संघात बदल करण्याचा सल्ला दिला. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटला संघात बदल न करण्याचा सल्ला दिला आहे. नेहमी अंतिम अकरामध्ये बदल केल्यामुळे खेळाडूंच्या मनात भीती असते की एवढ्या वर्षांनंतरही व्यवस्थापनाचा विश्वास जिंकण्यात आपण अपयशी ठरत आहोत. अंतिम अकरात बदल नको. उलट, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी, असे मत त्याने व्यक्त केले.

गांगुलीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीला सल्ला दिला आहे. जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर एक-एक धाव काढत मोठी धावसंख्या बनवावी लागेल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडे अद्याप पुनरागमन करण्याची क्षमता असल्याचे मला वाटतेय असे म्हणाला. आगामी कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणे आणि मुरली वियज यांना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण या दोघांनी या आधी अशा परिस्थितीत धावा केल्या असल्याचं गांगुलीने म्हंटल आहे.

You might also like
Comments
Loading...