पुण्यातील मुलींना धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने दिले क्रिकेटचे धडे

पुणे: घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणा-या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने काल पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुस-यांदा भेट दिली. आज झालेल्या पहिल्या ऐतिहासिक महिलांच्या आयपीएल टी २० प्रदर्शनी सामन्याचे औचित्य साधत ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांच्या पुढाकाराने पुण्यातील क्रिकेट शिकणा-या मुलींना थेट ख्रिस गेलशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

Loading...

संग्रहालयात ख्रिसने या मुलींना बॅट पकडण्याच्या तंत्राविषयी टिप्स दिल्या तसेच त्यांच्या मनातील क्रिकेट विषयक काही शंकाचे निरसन देखील केले. यावेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे व क्रिकेट शिकणारी काही मुले देखील उपस्थित होती. संग्रहालयाचे काम पाहून ख्रिस प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या यंदाच्या आयपीएल मोसमात शतक झळकावलेली बॅट व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची जर्सी संग्रहालयाकरीता रोहन पाटे यांच्याकडे आज सुपूर्त केली. याआधी ख्रिसने त्याचा सहभाग असलेल्या टी २० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाची जर्सी देखील संग्रहालयाला दिली होती.

आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग असली तरी भारतीय खेळाडूंनी इतर देशांत होणा-या लीग मध्ये सहभागी व्हायला हवे असे मत ख्रिसने व्यक्त केले. यंदाच्या मोसमात आयपीएल कोण जिंकणार असे विचारले असता गेल म्हणाला प्ले ऑफ साठी पात्र ठरलेले सर्वच संघ हे चांगल्या फॉर्मात असल्याने कोणता संघ आयपीएल जिंकेल याचा अंदाज वर्तविणे अशक्य आहे. तो पुढे म्हणाला की यंदाच्या आयपीएल मोसमात कित्येक सामान्यांचा निकाल हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर लागला अशा प्रकारची चुरस असताना कोण जिंकेल हा अंदाज देणे अत्यंत अशक्य आहे.

फुटबॉलपटू रोनाल्डोचा चाहता असलेल्या ख्रिस गेलला त्याच्या विषयी प्रश्न विचारला असता रोनाल्डो येत्या फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देईल, असा विश्वास गेल याने व्यक्त केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू