पाकिस्तानी क्रिकेटपटूला शुभेच्छा देणे धवनला पडले महागात

dhavan

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक नुकताच न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या वनडेत जखमी झाला.ज्यानंतर तो मॅच खेळू शकला नाही. त्याला झालेल्या दुखापतीनंतर भारताचा सलामीवीर शिखर धवनने ट्वीट करत शोएबच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. धवन या ट्वीटमुळे ट्रोल झाला असून भारतीय क्रिकेट फॅन्सने त्याला आफ्रिकेत खेळावर लक्ष देण्यास सांगितले आहे.

धवनने शोएब मलिकची विचारपूस करत ट्वीट केले की, ‘जनाब शोएब मलिक उम्मीद है आप ठीक हो रहे होंगे और जल्द ही अच्छे होकर फील्ड पर वापसी करेंगे। अपना ध्यान रखना।’ हा अंदाज दोन्ही देशांतील बहुतेक फॅन्सला खूप भावला. मात्र, काही फॅन्स असेही आहेत ज्यांनी धवनला पाकिस्तानी क्रिकेटर व सानियाच्या पतीची विचारपूस करणे भावले नाही.काहींनी पाकिस्तान कडून सीमेवर सुरु असणाऱ्या गोळीबाराची आठवण करून दिली तर,काहींनी टेस्ट सिरीज वर लक्ष देण्यास सांगितले.