ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ट्विटला चाहत्यांचं सडेतोड उत्तर

टीम महाराष्ट्र देशा- आज क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकरचा वाढदिवस. जगभरातून सर्वच क्षेत्रातील चाहते आज मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत मात्र सचिनचा द्वेष करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आजच्या दिवशी सुद्धा खोडसाळपणा केला आहे. सचिन तेंडुलकरला फ्लेमिंगनं त्रिफळाचीत केलं होतं, तोच व्हिडीयो क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दोघांच्या वाढदिवसाच्या दिवशी ऑफिशियल साईटवर टाकण्यासाठी निवडला. सचिनच्या चाहत्यांना त्यामुळे प्रचंड राग आला आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची अक्षरशः इज्जत काढली.

ऑस्ट्रेलिया संघ सचिनचा द्वेष कारण्यामागेचे नेमंक कारण काय? या साठी खालील आकड्यावर नजर टाकलीच पाहिजे. क्रिकेटचा देव असण्याऱ्या सचिनने सगळ्यात जास्त चांगली कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच केली आहे.

सचिन तेंडुलकरची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी वर एक नजर 

कसोटी क्रिकेट-  200 सामने खेळून 51 शतकं, 68 अर्धशतकं व 15,921 धावा फटकावणाऱ्या सचिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 सामन्यांमध्ये सर्वाधिक 11 शतकं, 16 अर्धशतकं व 3,630 धावा.

एकदिवसीय क्रिकेट- सचिननं 462 सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. त्यातही सर्वाधिक म्हणजे 3077 धावा केल्या आहेत 71 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिननं 49 शतकं व 96 अर्धशतकं केले आहेत. सर्वाधिक 9 शतकं व 15 अर्धशतकं ऑस्ट्रेलियाविरुद्धच आहेत.

खोडसाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियनांनी या महान फलंदाजाला वाढदिवसाच्या दिवशी डिवचायचा प्रयत्न केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कृत्यामुळे सचिनचे चाहते भडकले असून काही संतप्त चाहत्यांनी शिव्या घातल्या तर काहींनी सचिननं फ्लेमिंगला मारलेल्या षटकारांचे व्हिडीयो ट्विट केले आहेत.