मेडिकल कॉलेजसाठी सेना-काँग्रेसमध्ये श्रेयवाद सुरू, राष्ट्रवादी मात्र शांत

ncp shivsena-congress

उस्मानाबाद: शासकिय वैद्यकीय महाविद्यालय हा उस्मानबाद जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा विषय. मागील अनेक वर्षाच्या संघर्षाला अखेर काही दिवसांपूर्वी यश मिळाले. महाविकास आघाडीने हा विषय मार्गी लावत शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी दिली. यानंतर मात्र महाविकास आघाडीच्य घटक पक्षात श्रेयवादासाठी चढाओढ सुरू झाली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांनी जागोजागी या निर्णयाचे स्वागत करणारे फलक लावून श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेतला. पुढील काही दिवसात काँग्रेसने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे फलक लावून या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यात महाविकास आघाडीतील मुख्य कणा असलेला राष्ट्रवादी पक्ष मात्र मागेच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहिर कार्यक्रमात शरद पवारांचा या निर्णयामागे मोठा हात होता, असे सांगितले. पण स्थानिक कार्यकर्ते अजुनही शांत आहे. श्रेय घेण्याची आयती चालून आलेली ही संधी देखील दुर्लक्षित केली.

राष्ट्रवादीच्या आमदार राणाजगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या पक्षाला उतरती कळा लागली. सतीश चव्हाण, विक्रम काळे, जीवनराव गोरे, राहुल मोटे यांच्यासारखे मोठे नेते असूनही ग्रामपंचायतमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दोन वर्षापूर्वी उस्मानाबाद हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण आता आयते आलेले श्रेयही त्यांना घेता येईना असे चित्र सध्या दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या