मूडीजने केलेले भारतीय अर्थव्यवस्थेच कौतुक टॉम मुडी यांच्यासाठी ठरले डोकेदुखी

मूडीज ऐवजी टॉम मुडी झाले ट्रोल ; माकपच्या कार्यकर्त्यांचा प्रताप

मुंबई : पंतप्रधान मोदींचा विरोध करण्याच्या नादात मोदी विरोधकांकडून सोशल मिडीयावर ‘मूडीज’ ऐवजी अनेकांनी चक्क माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यावर तोंडसुख घेतल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने भारतीय अर्थव्यवस्थेचं केलेलं कौतुक विरोधकांना रुचलं नाही. त्यामुळे ‘मूडीज’वर टीका करण्याच्या नादात हे ट्रोलर्स तोंडघशी पडले आहेत.

bagdure

एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं होतं .मूडीजने केलेलं भारतीय अर्थव्यवस्थेचं तोंडभर कौतुक काही विरोधकांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी टीका करण्यासाठी मूडी एजन्सीच्या फेसबुक पेजचा शोध घ्यायला सुरुवात केली.मूडीजचं पेज शोधता शोधता विरोधकांना माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील टीम सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांचं पेज सापडलं. त्यामुळे ट्रोलर्सनी डोळेझाकून त्यांच्यावरच टीकेचा भडीमार केला. भारतीय अर्थव्यवस्थेला असं रेटिंग दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं थेट टॉम मूडी यांनाच सुनावलं.टीकाकारांमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणावर समावेश असल्याचं समोर आलं आहे.

You might also like
Comments
Loading...