कॉंग्रेसला पाठींबा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात उभी फुट

टीम महाराष्ट्र देशा- भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात रणसंग्राम सुरु झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील दोन दिग्गज नेते सिताराम येचुरी आणि प्रकाश करात आता आमने-सामने आले आहेत.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला धोबीपछाड देण्यासाठी कॉंग्रेसकडून विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक म्हणून नुकताच सोनिया गांधी यांनी डिनर डिप्लोमसीचा वापर करत विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. या शाही डिनरला प्रमुख विरोधीपक्षांच्या अध्यक्षांनी तसेच प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती.

Loading...

या पार्श्वभूमीवर सध्या हैदराबाद इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात जेव्हा कॉंग्रेसला पाठींबा देण्याचा मुद्दा चर्चेत आला तेव्हा माकपमध्ये उभी फुट पडल्याचं चित्र पहायला मिळालं . पाठींबा देण्याच्या मुद्द्यावरून दोन गट पडले शेवटी निर्णय घेण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीचा पर्याय पुढं आला. सिताराम येचुरी पाठिंबा द्यावा या मताचे आहेत, तर प्रकाश करात यांचा पाठिंब्यास विरोध आहे.

बलाढ्य भाजपला निवडणुकीत चारी मुंड्या चीत करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड बऱ्याच विरोधी पक्षातील नेत्यांना मान्य नाही. शिवाय कॉंग्रेसच्या नादाला लागून आपल्या पक्षाचं नुकसान का करून घ्यावं असा देखील एक मतप्रवाह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काय निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!