गोमाता, रॉजर फेडररआणि सेहवाग

वेबटीम : भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा सध्या सोशल मीडियावर चांगला बोलबाला सुरू आहे .आपल्या धडाकेबाज आणि रोखठोक मतं मांडण्याच्या शैलीमुळे सोशल मिडियाचं मैदान सेहवाग चांगलंच गाजवत असून आता महान टेनिसपटू रॉजर फेडररकडे याच्या संदर्भात केलेल्या ट्विट मुळे सेहवाग सध्या चर्चेत आहे. फेडरर आणि गाय यांच्यात कसा जिव्हाळा आहे, याचे भन्नाट फोटोच सेहवागने ट्विट केले असून हे ट्विट भलतंच चर्चेत आलं आहे.
  आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या फेडररचे तीन फोटो सेहवागने आपल्या ट्विटमध्ये पोस्ट केले आहेत. या तिनही फोटोंत फेडरर आणि गाय ही साम्यस्थळे आहेत. या फोटोंच्या सोबत कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिलं आहे. ‘महान रॉजर फेडररचं गायप्रेम पाहून आनंद झाला’.
दरम्यान, सेहवागचं हे ट्विट सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होऊ लागलं आहे. गाय,गोरक्षक,त्यांच्याकडून होणारे हल्ले  हे भारतात सध्यातरी संवेदनशील विषय आहेत. अर्थात त्यामुळेच सेहवागच्या ट्विटमधील गाय नव्या चर्चेला तोंड फोडून गेली आहे.