ग्राहकांच्या खिशाला कात्री, गायीचे दूध दोन रुपयांनी महागले

पुणे : गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ही दरवाढ येत्या ८ तारखेपासून लागू होणार आहे.दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे. पाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरीतखासगी व्यावसायिकांनी देखील भाव वाढीचा निर्णय घेतला. म्हशीचे भाव मात्र पुर्वी प्रमाणेच कायम राहणार आहेत. सध्या बाजारात गायीचे दूध ४२ ते ४४ आणि म्हशीचे दूध ५२ चे ५६ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.