जनतेसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या मुंबई पोलिसांसाठी अक्षय कुमारने दिला ‘मदतीसाठी हात’

blank

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून याचप्रमाणे कलाकारांकडून मदतीचे हात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने मुंबई पोलीस फाऊंडेशनला मदतनिधी दिला आहे. अक्षयने मुंबई पोलीस फाऊंडेशनला २ कोटी रुपयांचा मदतनिधी दिला आहे.

याबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुम्ही केलेल्या मदतीमुळे शहरांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस बंधूभगिनींना या निधीचा नक्कीच फायदा होईल, असं परमबीर सिंह म्हणाले.

दरम्यान, अक्षयनेही मुंबई पोलीस आयुक्तांचं ट्विट पाहिल्यानंतर रिट्विट केलं आहे. यामध्ये त्याने करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंडूरकर आणि संदीप सुर्वे यांनी आदरांजली वाहिली आहे. या काळात देशातील प्रत्येक नागरिक त्यांना शक्य होईल त्यानुसार इतरांची मदत करत आहेत.