लॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. प्रशासन आणि सरकारने वारंवार आदेश आणि विनंती करूनही लोकं काही रस्त्यावर येणं थांबत नाही. अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडा अश्या स्पष्ट सूचना असतानाही काही जण विनाकारण गाड्या घेऊन फिरताना दिसतं आहे.

आता याबाबतची पहिली कठोर कारवाई बारामतीत झाली आहे. बारामतीच्या न्यायालयाने लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तिघांना ३ दिवसाची कैद आणि ५०० रुपये दंड ठोठावला आहे. याबाबतच वृत्त झी २४ तास या मराठी वृत्त वाहिनीने दिलं आहे. यामुळे आता प्रशासन आणि न्यायव्यवस्थेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

तीन दिवस जरी शिक्षा कमी वाटत असली तरी या युवकांना यापुढे चारित्र्य प्रमाणपत्र , व्यवसाय प्रमाणपत्र ,पासपोर्ट , शासकीय नोकरी इ. साठी भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता तरी या कारवाईचा धाक बसून लोकं सुधारतील आणि अनावश्यक घराबाहेर पडण टाळतील अशी अपेक्षा आहे.

हेही पहा –