न्यायालयातील शिपायाने चक्क वकिलाकडेच मागितली लाच

money

औरंगाबाद : न्यायालयात गुन्ह्यांचा निवाडा केला जातो. दोषींना शिक्षा होते तर एखाद्यावरचा अन्याय दूर होतो. न्यायालयाकडे सर्व जण आशेची किरण म्हणून पाहतात. परंतू, न्यायालयातच भ्रष्टाचार होत असेल तर मग विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार औरंगाबादेत घडलाय. एका न्यायालयीन शिपायाने अशिलाविरोधातील वॉरंट पोलिसांना देण्यापासून थांबविले. विशेष म्हणजे याचा मोबदला म्हणून चक्क वकिलांकडून एक हजार रुपयांची लाच मागितली.

राहुल अनंतराव पांचाळ (वय ३२) असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. तो जिल्हा न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. प्रथमवर्ग न्यायालयाने तक्रारदार त्यांच्या अशीलाविरुद्ध जेल वारंट काढण्याचे आदेश दिले होते. हे वारंट पोलिसांना देण्यापासून थांबविल्याने बक्षीस म्हणून १ हजार रुपये लाच त्यांनी मागितली.

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोदविली. शुक्रवारी पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर आणि कर्मचाऱ्यानी अदालत रोडवरील एका हॉटेलमध्ये सापळा लावला. त्यावेळी पांचाळ याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या